रिझल्ट फोबिया: विद्यार्थ्यांच्या मनातील भीती समजून घेऊया

0
30

आजच्या स्पर्धात्मक युगात परीक्षेचा निकाल (Result) हा फक्त गुणांचा आकडा राहिलेला नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, ओळख आणि भविष्यासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये “रिझल्ट फोबिया” म्हणजेच निकालाबाबत अतिव भीती निर्माण होताना दिसते.

रिझल्ट फोबिया म्हणजे काय?

रिझल्ट येण्याआधी किंवा नंतर विद्यार्थ्यांना होणारी तीव्र चिंता, भीती, घाबरणे, नकारात्मक विचारांचा वाढलेला प्रभाव याला “रिझल्ट फोबिया” म्हणतात.

लक्षणे (Symptoms):

सतत भीती वाटणे, मन अस्वस्थ राहणे

झोप न लागणे किंवा भूक कमी होणे

“मी नापास होईल”, “लोक काय म्हणतील?” असे विचार तसेच

आत्मविश्वास कमी होणे

काही वेळा रडणे, चिडचिड किंवा एकटेपणा वाढणे.

कारणे (Causes):

पालक व समाजाचा जास्त अपेक्षांचा दबाव

स्वतःवर अतिव परफेक्शनची अपेक्षा आणि इतरांशी तुलना करणे.

अपयशाबद्दल चुकीचे समज

यावर उपाय (Solutions):

निकाल हा आयुष्याचा शेवट नाही, तर एक टप्पा आहे हे समजून घ्या

पालकांनी मुलांना unconditional support द्यावा

स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या

नियमित relaxation techniques (श्वसन, meditation) चा वापरा करा.

गरज वाटल्यास समुपदेशन (Counseling) घ्या

पालकांसाठी संदेश:

मुलांच्या गुणांपेक्षा त्यांचा प्रयत्न आणि मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. निकाल काहीही असो, मुलांशी संवाद ठेवा, त्यांना समजून घ्या आणि त्यांना सुरक्षित वातावरण द्या.

लक्षात ठेवा:

“एक निकाल तुमचं भविष्य ठरवत नाही, पण तुमची मानसिकता नक्की ठरवते.”

– कल्याण कौन्सलिंग ऑड सायकोथेरेपी क्लिनीक

कल्याणी नंदेश्वर 8390291933