कामठी :- कामठी तालुक्यातील रणाळा येथे संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो च्या वरील अर्जाचे निकालीकरण करण्यात आले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचून शासकीय कामकाजातील त्रास कमी झाल्याचे दिसून आले.
सर्वसामान्यांना शासकीय कामासाठी तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात जावे लागते यात वेळ व खर्च दोन्ही वाढतो ही अडचण लक्षात घेऊन शासनाने महाराजस्व अभियान हाती घेतले असून शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रत्यक्षात राबविन्यात येत आहे.या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर कार्यक्रमात माजी जी प सदस्य अनिल निधान,येरखेडा नगर पंचायत अध्यक्ष राजकीरण बर्वे,रणाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे, कामठी तालुका समनव्यय समितीचे अध्यक्ष माजी सभापती उमेश रडके, नागोराव साबळे, येरखेडा नगर पंचायत चे सभापती ऍड आशिष वंजारी ,गादा ग्रा प।सरपंच सचिन डांगे, एसडीओ संजय पवार, नायब तहसिलदार राजीव बमनोटे,नायब तहसीलदार मयूर चौधरी नायब तहसीलदार अमर हांडा ,गटविकास अधिकारि बाळासाहेब यावले प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी,पोलीस पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या शिबिरात विविध शासकीय सेवेचा लाभ देण्यात आला.विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमिलेअर,अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.तसेच संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात आला.








