परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम पावडदौना येथे आज सामूहिक विवाह सोहळा, विदर्भातील 26 जोडपी होणार विवाहबद्ध

0
86

किशोर साहू, मौदा :- प्रचलित विवाह पद्धती सर्वसामान्य लोकांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असल्याने सामाजिक सेवेची जाणीव ठेवून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या एकमेव भावनेने वेळ, धन व श्रम यांच्या अपव्य टाळण्यासाठी आणि सामाजिक जागृतीनुसार परिवर्तन घडवून आणण्याकरिता एका परमेश्वराच्या मानवाला परिचय करून देणारे अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट व्यसन, स्त्रीभ्रूण हत्या, जातीय भेदभाव नष्ट करणारे, मानवधर्माचे प्रणेते व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे व मार्गदर्शनानुसार प्रथमच संस्थेच्या वतीने परमात्मा एक सेवक सामूहिक विवाह सोहळा 2026 चे उद्या रविवार ,(ता. 19 एप्रिल)ला सायंकाळी साडेपाच वाजता परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना येथे आयोजित केले आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात विदर्भातील एकूण 26 विवाह जोडपी विवाह बद्ध होणार आहेत.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,राज्यमंत्री आशिष जयस्वाल ,श्याम कुमार बर्वे, नाना पटोले ,परिणय फुके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, मोहन मते, नरेंद्र भोंडेकर ,प्रवीण दटके, कृपाल तुमाने ,टेकचंद सावरकर, सुनील केदार, नरेंद्र बोरकर, प्रसन्ना तिडके, शीला नितेश वांगे,संजय पवार, दत्तात्रय निंबाळकर, सारीन दुर्गे सह राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने, उपाध्यक्ष देवराम तुमसरे ,सचिव किरण राऊत, सहसचिव प्रदीप चौधरी, कोषाध्यक्ष सुभाष दहेकर, संचालक गण ईश्वर चीचघरे ,रवींद्र खापरे, रमेश नकाते ,रामेश्वर जोगी ,महेंद्रसिंह गुरुबेले, टिकाराम पराते, गुलाब साठवणे, सुरेश कळंबे ,हेमराज शिंदेकर ,तापेश्वर वैद्य सह सामूहिक विवाह सोहळा 2026 समितीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.