महापौरांच्या जनता दरबारात अनेक प्रश्न लागले मार्गी

0
36

नागपूर :- महापौर निता ठाकरे यांच्या जनता दरबारात नागरिकांनी मालमत्ता कर, गडर लाईन, रस्ते समस्या, सिमेंट रस्ते, उद्यान, पथदिव्यांसोबतच गॅस सिलेंडर मिळण्यात होणाऱ्या विलंबाची तक्रार ही नोंदविली. यावेळी महापौरांनी नागरिकांच्या सर्व तक्रारीची दखल घेत नेहरूनगर झोनच्या अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. जनता दरबारात अनेक प्रश्नांचे निराकरण तत्काळ करण्यात आले. महापौरांच्या पहिल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

नेहरूनगर झोन अंतर्गत दुर्गा माता मंदिर, विरंगुळा केंद्र, सहकार नगर येथे आयोजित जनता दरबारात नेहरूनगर झोनच्या सभापती सिमा ढोमणे, जलप्रदाय समितीचे उपसभापती विजय(पिंटू) झलके, नगरसेवक किशोर कुमेरिया आणि नगरसेविका मंगला गवरे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी नंदा येवले, सर्वश्री बाळा विठालकर, प्रीतम देशमुख, संजय, राजू खोडे, अमर टिचकुळे, जया बनाईत, पूनम विश्वकर्मा, शुभम मुंडले, दुर्गा काळे, वैशाली गोपटे व इतर उपस्थित होते.

जनता दरबारात विविध विभागांच्या २३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सहायक आयुक्त विकास रायबोले, कार्यकारी अभियंता प्रफुल आसलकर, विभागीय स्वच्छता अधिकारी आनंद खोडसकर, कनिष्ठ अभियंता देवचंद काकडे आणि  जयदेव फडतारे, स्वच्छता निरीक्षक आकाश भोयर. कर निरीक्षक कैलास ऊके व संदीप पतंगे, प्र. कर निरीक्षक किसन बारई व सचिन मेश्राम, कर संग्राहक भावेश सेलोकर, सर्वश्री. अमोल तळवेकर, विलास मोहाडीकर, हिरालाल खापरे, मयुरी तिजारे, श्वेता तिडके उपस्थित होते. तसेच याप्रसंगी नागरिकांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी सुद्धा शिबीर पोस्ट ऑफीसच्या सहकार्याने लावण्यात आले होते. या शिबिराला देखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.