कन्हान :- गणेश नगर कन्हान येथिल चिमुकल्यानी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माहात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर छोटे छोटे नाट्य, भीम गीतावर नर्त्य, थोर पुढारी यांची वेशभूषा आणि त्यांच्या जीवन चरित्रवर व्याख्यान करण्यात आले. तदंतर भोजन दान करून डॉ. बाबासाहेब आंबे डकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास या सर्व चिमुकल्यांचे आई, वडील, कीका काकु, आजी आजोबा आणि सर्व नगरवासी आदीनी उपस्थित राहुन या चिमुकल्यांचे कौतुक केले.



