– कारवाईत तीन मोबाइल, रोख रक्कमेसह एकुण ४०,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान :- परिसरातील सत्रापुर लेबर कॅम्प येथे सुरु असलेल्या आईपीएल जुगार अड्डयावर कन्हान पोली सांनी धाड टाकुन दोघांना अटक करून कारवाईत तीन मोबाइल, रोख रक्कमेसह एकुण ४०,६०० रुप यांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.१५) एप्रिल ला पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर , पो हवा हरिष सोनभद्रे, अमित यादव सह अन्य पोलीस कर्मचारी अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी परिस रात पेट्रोलिंग करीत होते . दरम्यान गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की सत्रापुर येथे दोन इसम इंडीयन प्रिमीयर लिग या सिरीजमधील राॅयल चैलेंजर्स बैंगलोर विरूध्द लखनऊ सुपर जाइंट्स या सुरु अस लेल्या क्रिकेटच्या सामन्यावर मोबाईल फोन व्दारे बेटींग लावुन हारजितचा जुगार खेळत आहे. अश्या मिळालेल्या माहीतीच्या आधरे कन्हान पोलीसांनी सापळा रचुन घटनास्थळी धाड टाकली असता आरो पी १) शेखर महल्लेश रेड्डी वय ४० वर्ष आणि २) आदीत्य अपत्रा बुड्डुपी वय १९ वर्ष दोघेही रा. लेबर कँम्प सत्रापुर, कन्हान हे क्रिकेटच्या सामन्यावर मोबाईल फोन व्दारे पैश्यांची देवाणघेवाण करुन बेटींग करतांना मिळुन आले. तसेच त्यांच्याकडे एक रजिस्टर ज्यामध्ये बेटींग लावणाऱ्या ग्राहकाकडुन घेतलेले आकडे लिहलेले दिसुन आले. कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन तीन मोबाइल, रोख रक्कम आणि रजिस्टर असा एकुण ४०,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कन्हान पोलीसांनी दोनही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.