Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हिंदी महानाट्य “जय महाकाल” चे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवारी

– जय महाकाल या महानाट्यात, चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य च्या भूमिकेत आयुष तिवारी

नागपूर :- रेशीमबाग येथील कविवर्य सुरेशभट सभागृहात, मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी, सायंकाळी 7 वाजता. निराली एंटरटेनमेंट आणि गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गुरुगोरखनाथ मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी भव्य महानाट्य”जय महाकाल” चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ला प्रमुख उपस्थिती म्हणून कांचन नितीन गडकरी, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हत्तीबेड, अभिनेत्री प्रियंका ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे आचार्य नवीन महाराज यांची उपस्थिती राहील. याप्रसंगी विशेष उपस्थितीत आमदार मोहन मते, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, अनिल सोले, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार टेकचंद सावरकर यांची उपस्थिती राहणार आहे. महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक हर्षकुमार यादव आणि नागपूरातील निर्माता दर्शननाथ शंकरराव जाधव यांचे असून हा कार्यक्रम निःशुल्क आहे. तरी हिंदी महानाट्य, जय महाकाल पहाण्यासाठी विसरु नका, कारण या महानाट्यात चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य आणि राजा भर्तहरिनाथ की महागाथा दाखवणार आहे. या सर्वांनी जय महाकाल, हिंदी महानाट्याचे आयोजन केलेले आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त मोठ्या संख्येने घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com