Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरासमोर चारचाकी वाहनाचे कांच फोडुन चोरट्यांनी वाहन चोरी केले

– कांद्री परिसरातील घटना, अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत जय दुर्गा नगर जे. एन.दवाखाना जवळ कांद्री परिसरातील घरासमोरुन अज्ञात चोरट्यांनी वाहनाचे कांच फोडुन वाहन चोरुन नेल्याने फिर्या़दी कार मालक यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित कार व आरोपीचा शोध घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार रमेश उमाशंकर भारव्दाज वय ४५ वर्ष रा. जय दुर्गा नगर जे एन दवाखाना जवळ कांद्री यांचा मालकीची एम एच ४० एआर ९६७२ क्रमां काची मारुती अल्टिका कार असुन त्यांनी २०१६ मध्ये नगदी खरेदी केली होती. कार दररोज घराच्या कंपाऊंडच्या गेटजवळ पार्क करत होते. दोन दिवस त्यांची कार घरासमोर पार्क केलेली होती. कारची काच आणि कुलुप बंद असुन चाब्या घरात ठेवल्या होत्या आणि कारचे मुळ कागदपत्रे कारमध्ये होते. बुधवार (दि.१५) एप्रिल ला रात्री जेवण झाल्यावर रमेश रात्री १२ वाजे पर्यंत घरासमोर फिरत होते. तेव्हा त्याची चारचाकी वाहन घरासमोर उभी होती. दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि.१६) एप्रिल ला मुलांना शाळेत सोडण्यासाठी रमेश सकाळी ७ वाजता उठले आणि बाहेर आले तर त्याची मारुती अर्टिका चारचाकी वाहन गेटजवळ उभी दिसली नाही आणि वाहनाच्या खिडकीच्या काचेचे तुकडे जमिनीवर पडलेले दिसुन आले. रमेश ने आजुबाजुच्या परिसरातील लोकांना वाहना बद्दल विचारपुस आणि शोध घेतला असता वाहन मिळुन आले नाही. फिर्यादी रमेश भारव्दाज यांची मारुती अर्टिका वाहन क्र.एम एच ४० एआर ९६७२ वाहन किंमत २,००,००० रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरासमोरुन खिडकीचे कांच फोडुन चोरुन नेले. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी रमेश भारव्दाज यांचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित कार व आरोपीचा शोध घेत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com