किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोवरी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अंकुश निरगुळकर, उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य,गट ग्रामपंचायत दहेगाव भोवरी सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे आणि सदस्य दिनेश बावणे उपस्थित होते. यांनतर दहेगाव येथे गावात प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभातफेरी मध्ये गट ग्रामपंचायत दहेगाव येथील सरपंच भारती आंबिलढुके, उपसरपंच रविंद्र ढोमणे गट ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव आणि भोवरी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझीम नृत्य सादर केले. मुख्याध्यापिका पठाण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारमंच प्रेरणादायी गटांकडून विद्यार्थ्यांना पेन आणि नोटबुक चे वाटप करण्यात आले.



