Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 36 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता.21)शोध पथकाने 36 प्रकरणांची नोंद करून 15,500 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू.300 रूपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणीकचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून 3,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. भूमि रिओन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत आदर्श वाशिमकर यांनी विनापरवानगी रस्ता खणताना विद्युत लाईन तोडल्यामुळे रू.20,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. सोलर स्क्वेयर यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे.स्काय लाईन इंफ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.बॉड मॅथ अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्याने रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू.50,000 दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com