Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ‘उष्मघात कक्ष’ सुरू

कामठी :- मे महिना लागण्याच्या तोंडावर आहे मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातिपासूनच तापमान 44 अंशावर पोहोचला आहे .वाढत्या तापमानामुळे उष्मघाताची शक्यता नाकारता येत नाही ,सध्या सूर्य आग ओकत असताना अशा स्थितीत उष्मघाताच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळावे याकरिता कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिक्षिका डॉ निशात शेख यांच्या नेतृत्वात सज्ज झाली असून या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुरुष आणि स्त्री वर्गासाठी स्वतंत्र असे उष्णघात कक्ष (शीत वार्ड)निर्माण करण्यात आले असून उष्मघाताच्या रुग्णांना उपचार मीळण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सध्या उन्हाचे उच्चाकी तापमान सुरू झाले असून उन्हाळ्यात तापमानात वाढ होऊन येणाऱ्या स्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागते.तापमानात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते परिणामी उष्मघाताचा धोका संभवतो.अशा स्थितीत उष्मघाताच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून तयारी करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिक्षिका डॉ निशात शेख यांनी या उच्चाकी तापमानापासून काळजी घेण्याचे आवाहन करीत या उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी आपली कामे ही सकाळच्या वेळेत आटोपुन घेऊन दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत शक्यतो बाहेर फिरणे टाळावे

उष्मघाताची लक्षणे-

उषमघातामुळे प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फरन्हाईट पर्यंत पोहोचल्यास स्नायूंचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे ,हृदयाचे ठोके वाढणे क धडधडणे लुस्त वाटणे हे आहेत.

-वैद्यकीय अधिक्षिका डॉ निखत शेख -उन्हात जाणे शक्यता टाळावे,

विशेषतः दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळावे, उन्हाळ्यात शक्यता सुती,सैल,पांढरे कपडे वापरावेत, कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळावे, दिवसभरात किमान तीन लिटर पाणी प्यावे ,आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी .

उष्मघात झाल्यास त्या व्यक्तिला शक्यतो सावलीच्या ठिकाणी झोपवावे.

ओल्या कपड्याने वा गार पाण्याने पूर्ण शरीर पुसून घ्यावे. डोक्यावर पाणी टाकत राहावे,तसेच ओआर एस ,निंबू शरबत वा ताक द्यावे अशी प्रतिक्रिया वैद्यकिय अधिक्षिका डॉ शबनम खाणुनी यांनी व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com