नागपूर :- गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शन नगर येथे ग्राम जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. ग्राम जयंतीच्या पहिल्या दिवशी सामुदायिक ध्यान पाठ, रामधून व रोग निदान शिबिराने करण्यात आली. उत्सवात साईबाबा महिला भजन मंडळ, माऊली भजन मंडळ, मुन्ना ठाकूर यांचे सुंदर कांड, हरिपाठ असे विविध कार्यक्रम करण्यात आले. दुसऱ्या दिवशी व्यसनमुक्ती सम्राट हभप. मधुकर खोडे महाराज यांचे व्यसनमुक्तीवर प्रबोधन झाले. सांयकाळी डॉ. सचिन काळे महाराज यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमात तुकडोजी महाराजांच्या मार्ग फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने परसवाडा येथील नाना महाराज, गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, माजी आमदार सुधाकर कोहळे, ज्ञानेश्वर रक्षक, रामराव चोपडे, नरेंद्र राऊत, नगरसेवक शैलेश पांडे, प्रमोद सिंग ठाकूर, ममता मुन्ना ठाकूर, स्नेहल बंडू ठाकरे, अमर खोडे, मंजुषा चाचिरकर तसेच अश्विन राऊत, रमेश चोपडे, वैशाली चोपडे, अँड. प्रकाश टेकाडे, चंद्रशेखर चौधरी, तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रा.रामदास टेकाडे, गोविंदराव श्रीरामे, रमेश सोनकुसरे, सतीश राईकवार, संजय मोहोड, मधुकर धोटे, मधुकर राऊत, वसंता फरतोडे, दामोदर मामुलकर, डॉ प्रमोद मेहेश्रे, अरुण राऊत, तेजराम करडे, दिलीप बोदंगुलवार, रामराव डांगोरे, रवी माहुलकर, गुंडेराव ठाकरे, विठ्ठलराव झोड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय मोहोड तर आभार रमेश सोनकुसरे यांनी मानले.








