– मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी ११ मेपर्यंत प्रस्ताव सादर करावे
– मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
यवतमाळ :- पाटबंधारे, जलसंधारण विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी हक्काचे हस्तांतरण झालेले ०-५०० हेक्टर पर्यंतचे तलाव शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीमार्फत पात्र संस्थांना मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येतात. सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्ष कालावधीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील ५०० हेक्टरपर्यंतचे एकूण १३ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार आहेत. त्यासाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
या १३ तलावांमध्ये तरोडा (ता. उमरखेड), खरद (ता. यवतमाळ) , मजरा (ता. राळेगाव), येडशी (ता. राळेगाव), राजूर (ता. कळंब), अर्जुना (ता. यवतमाळ), उमडा (ता. यवतमाळ), कापरा (ता. बाभूळगाव), डिगडोह (ता. राळेगाव), टाकळी (ता. यवतमाळ), करणवाडी (ता. केळापुर), पाचपहूर (ता. झरीजामणी), देवगाव (ता. आर्णी) हे तलाव मासेमारीकरीता ठेक्याने द्यावयाचे आहेत.
या तलावांपैकी संबंधित तलावांसाठी नोंदणीनुसार, उपविधीतील कार्यक्षेत्रानुसार पात्र असणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका मागणी परिपूर्ण प्रस्ताव दि.११ मे २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत, पहिला माळा, जिल्हाधिकारी परिसर, यवतमाळ येथे सादर करावा. या प्रक्रियेत पात्रतेचे निकष तलाव ठेका शासन निर्णय दि.३ जुलै २०१९ नुसार राहतील. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा,असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

