spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेला गती देण्यासाठी जोमाने कामाला लागावे – खासदार श्यामकुमार बर्वे

कामठी :- रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर जिल्हा ग्रा अध्यक्ष अश्विन बैस ,कामठी शहर कांग्रेस अध्यक्ष धीरज यादव,माजी जी प सभापती प्रा अवंतीका लेकुरवाडे , कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता नगरसेवक काशिनाथ प्रधान यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी नगर कांग्रेस कमिटी कार्यालयात भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाच्या वतीने एस आय आर मॅपिंग प्रक्रिया संदर्भात बी एल ए ,पदाधिकारी ,व कार्यकर्त्यासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी मतदार यादीचे लोकशाहीतील महत्व स्पष्ट करताना सांगितले की एकही पात्र मतदार मतदार यादीतील नावापासून वंचित राहता कामा नये हीच आपली प्राथमिकता आहे.पक्षाच्या बूथ प्रमुख, बी एल ए ने आप आपल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन मतदार नोंदणी आणि पुनर्विलोकन मोहीम प्रभावीपने राबवावी .पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेला गती देण्यासाठी मतदार संघातील सर्वांनी जोमाला कामाला लागले पाहिजे असे आवाहन सुद्धा केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी, कांग्रेस सेवादल अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे, नगरसेवक आसिफ सरमातीया, नगरसेवक अभिषेक चिमनकर,नगरसेवक अनिल सूर्यवंशी,नगरसेविका प्रतिभा गजभिये, नगरसेविका रंजना पानतावणे,नगरसेविका सातीका खांडेकर,माजी नगरसेविका ममता कांबळे, राजकुमार गेडाम,कामराण जाफरी, फारूक कुरेशी, आरिफ कुरेशी ,राजेश कांबळे,आशिष मेश्राम, अभय गेडाम,सुमित गेडाम, प्रदीप साखरकर,फिरोजभाई,अलंकार गजभिये, दिनू नागदेवें कांग्रेस चे आदी कार्यकर्ता गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

याप्रसंगी कामठी नगर परिषदचे विरोधी गट नेता काशिनाथ प्रधान यांनी आपल्या मार्गदर्शनातून बूथ व्यवस्थापणाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की ‘बुथप्रमुख’ हा संघटनेचा कणा आहे.प्रत्येक बूथ प्रमुख सक्षम असेल तरच निवडणुकीत विजय निश्चित होतो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सुरू असलेल्या एस आय आर संदर्भत जवाबदारीने काम करीत मतदार यादी अचूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा .आपल्या कांग्रेस च्या बी एल ए ने आपल्या मतदान केंद्राची यादी सुव्यवस्थित करून घ्यावी जेणेकरून याचा आपल्या कांग्रेस ला आगामी निवडणूक जिंकण्यास फायदा होईल.तसेच प्रा अवंतिका लेकुरवाडे यांनी सांगितले की कांग्रेस च्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असून आगामी निवडणुकासाठी पक्ष अधिक सक्षमपणे मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.

सभेचे प्रास्ताविक व संचालन नागपूर जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी केले तर आभार शहराध्यक्ष धीरज यादव यांनी केले.

Popular Articles