spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनगणनेसाठी कामठी तालुका प्रशासन सज्ज

कामठी :- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुका प्रशासन पूर्णता सज्ज झाले असून कामठी शहरातील शहर तसेच ग्रामीण भाग मिळून 368 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.या कामासाठी शहर व ग्रामीण अशा स्वतंत्र पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

कामठी शहरात 109 प्रगणक नियुक्त करण्यात आले असून ग्रामीण भागात 195 प्रगणक काम पाहणार आहेत.या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामीण भागात 35 सुपरवायझर तर शहरी भागात 22 सुपरवायजर तसेच ग्रामीण मध्ये 4 व शहरात 3 मास्टर ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर जनगणना प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रत्येक कुटुंबाकडून 31 प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करण्यात येणार आहे.या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची सविस्तर नोंद केली जाणार आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांचे काल 23 एप्रिल पासून कामठी तहसील कार्यालय सभागृहात प्रशिक्षण सुरू आहे.प्रत्यक्ष जनगणना कामास 14 मे पासून सुरुवात होणार आहे यासाठी तहसील कार्यालय व नगर परिषदे मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे.दरम्यान ग्रामपातळीवर तसेच शहरात प्रत्यक्ष कुटुंब सर्वेक्षण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना स्वतंत्र मानधन व भत्ताही देण्यात येणार आहे.

Popular Articles