Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लक्ष्मी यादव व धनश्री देशपांडे यांनी स्वीकारला झोन सभापतीपदाचा पदभार

नागपूर :- भाजपच्या नगरसेविका लक्ष्मी ओमप्रकाश यादव यांनी लक्ष्मीनगरच्या झोन सभापतीपदाचा व धनश्री देशपांडे यांनी धरमपेठ झोन सभापती पदाचा पदभार (ता. 24) झोन कार्यालयांमध्ये स्वीकारला. झोन कार्यालयांमध्ये झालेल्या पदग्रहण समारंभात महापौर  निता ठाकरे यांनी दोन्ही नवनियुक्त झोन सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार माया इवनाते, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, राज्य सफाई कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष सतीश डागोर, माजी महापौर नंदा जिचकार, माजी महापौर वसुंधरा मसूरकर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी झोन सभापतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. लक्ष्मी यादव या प्रभाग क्रमांक 16 (ब) या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. भाजपच्या लक्ष्मी ओमप्रकाश यादव यांनी मनपाच्या लक्ष्मीनगर झोन क्रमांक 1 च्या झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभात झोन सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुन्ना यादव, नगरसेवक दिलीप दिवे, माजी नगरसेवक किशोर वानखेडे, माजी नगरसेवक रमेश सिंगारे यांच्यासह सहायक आयुक्त धनंजय जाधव झोनमधील विविध पक्षांचे नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

त्याचप्रमाणे भाजपच्या धनश्री देशपांडे यांनी आज धरमपेठ झोन क्रमांक 2 च्या झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभात झोन सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. त्या प्रभाग क्रमांक 15 (क) या मतदारसंघातून महापालिकेत निवडून आलेल्या आहेत. धरमपेठ झोन कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभाला यावेळी नगरसेविका साधना बरडे, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड, मनपाच्या गलिच्छ वस्ती निर्मुलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती रुतिका मसराम, भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक अभिजीत प्रभूकांत झा, नगरसेवक  विनय दाणी, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक  विनोद कन्हेरे, नगरसेवक विनोद बघेल, नगरसेविका पूजा पाठक यांच्यासह सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.