Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रामटेक- खात -भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील घोटीटोक ते मसला या गावादरम्यानच्या सिमेंट रस्त्यांच्या मधोमध मोठ मोठ्या भेगांमुळे रात्रीला नियमित होत आहेत अपघात, रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची ग्रा पं निमखेडा चे ग्रा पं सदस्य पूर्णचंद्रराव वेमूरी यांची मागणी 

किशोर साहू, मौदा :- दोन वर्षांपूर्वी 252 करोड रुपयाचे इन्फ्रा कंपनी द्वारे रामटेक- खात- भंडारा या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले. या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या घोटीटोक ते मसला या गावादरम्यान या सिमेंट रस्त्याच्या मधोमध मोठ मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. रात्रीला त्या भेगांमध्ये दुचाकीधारकांचे दुचाकीचे चाके फसून जीवघेणे अपघात घडत आहे. असेच दोन दुचाकीधारकांचे अपघात बुधवार (ता. 22 एप्रिल) ला रात्री साडेदहाच्या दरम्यान निमखेडा ग्रा पं सदस्य पूर्णचंद्रराव वेमूरी यांच्या डोळ्यासमोर घडले. संबंधित प्रशासन विभाग व वरिष्ठ अधिकारी चारचाकी धारकांचे चाके फसण्या एवढे भेगा सिमेंट रस्त्यावर पडल्यानंतर दुरुस्त करणार काय? असा संतप्त सवाल वेमूरी यांनी संबंधित प्रशासनासमोर मांडला असून, घोटीटोक ते मसला या रस्त्यावरील व रामटेक -खात- भंडारा या संपूर्ण रस्त्यावरील भेगा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी वेमूरींसह या रस्त्यावरून आगमन करणाऱ्या दुचाकी, चार चाकीधारक वाहन चालकांनी केली आहे. अल्पावधीतच या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडत असल्याने हा रस्ता तयार करीत असताना निकृष्ट दर्जाचे साहित्य तर वापरले नाही ना? असा सवालही वाहनधारकांना पडलेला आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी वाहनधारकांनी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.