Thursday, April 30, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी नोंदणी आवश्यक

– विभागात 14 लाख 73 हजार 662 शेतकऱ्यांची नोंदणी

 – ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणीची सुविधा

–  राज्यात 1.32 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले

 नागपूर :- कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा बियाणे खते औषधे प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. नागपूर विभागात 14 लाख 73 हजार 662 शेतकऱ्यांनी फॉर्मल आयडी काढले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडीसाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ तसेच खते औषधे व बियाणे यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. त्यामुळे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कृषी विभागाने हेल्पडेस्कची व्यवस्था केली आहे. या सेवेचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी. फार्मर आयडी नोंदणीसाठी नागपूर व अमरावती विभागासाठी अजितकुमार गेजगे व शीतल कोंदरे यांची नियुक्ती केली आहे.

राज्यात 14 नोव्हेंबर पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 15 एप्रिल पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत एक कोटी 71 लाख खातेदारांपैकी एक कोटी 32 लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली आहे. फार्मर आयडीसाठी नोंदणी करण्यासाठी सेवा सुविधा केंद्रावर सुविधा उपलब्ध आहे. शेतकरी स्वतःहून ॲग्रीस्टॅक पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात. त्यामुळे 20 मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवान करण्यात आले आहे.

नागपूर विभागात 14 लाख 73 हजार 886 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 14 लाख 73 हजार 665 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत.

विभागातील जिल्हा निहाय फार्मर आयडी तयार झाले आहेत. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील 2 लाख 44 हजार 824 शेतकऱ्यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लाख 37 हजार 044, गोंदिया 2 लाख 62 हजार 674, नागपूर 2 लाख 52 हजार 874, तर वर्धा जिल्ह्यातील 2 लाख 3 हजार 216 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत.

अमरावती विभागातील 18 लाख 37 हजार 589 शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी 18 लाख 37 हजार 503 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील 2लाख 57 हजार 667, अमरावती जिल्ह्यातील 4 लाख 21 हजार 694, बुलढाणा जिल्ह्यातील 4 लाख 90 हजार 329, वाशीम जिल्ह्यातील 2 लाख 27 हजार 693, तर यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 40 हजार 120 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत.

कृषी विभागाचा राज्यस्तरीय हेल्प डेस्क

फार्मर आयडीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय हेल्प डेस्क तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागासाठी अजितकुमार गेजगे (9657109809 ) व शीतल कोंदरे (91723119637) यांची नागपूर व अमरावती विभागासाठी हेल्प डेस्कच्या संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.