– मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांना शाळेत रेल्वे फाटक, सिग्नल व इतर कारणांमुळे येण्यात होत आहे उशीर
किशोर साहू, मौदा :– जि प शाळेत खिचडी शिजवणाऱ्या महिलेचे काम खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना देणे हे अशैक्षणिक कामे आहे. मात्र तापमान वाढीमुळे सर्व शाळा सकाळच्या पाळीत सकाळी सात ते साडेदहा या वेळेत भरविण्यात येत आहे. सकाळच्या पाळीत मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकवृंदांना शाळेत येण्यास सिग्नल किंवा रेल्वे फाटक किंवा इतर कारणांमुळे येण्यास उशीर होत असल्याने, खिचडी शिजवणारे महिला किंवा तिच्या परिवारातील सदस्य मुख्याध्यापक व शिक्षकवृंद शाळेत येईपर्यंत विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवण्यास शाळेतील शैक्षणिक कार्यात मदत करीत आहेत.
रेवराल ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रेवराल टोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडी शिजवणाऱ्या महिला मेश्राम यांचे पती ध्यान मेश्राम हे नेहमी सकाळच्या पाळीत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या अनुपस्थित विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवण्यासाठी नेहमी वृत्तपत्र वाटत असताना शाळेत दिसतात. याबाबत ध्यान मेश्राम यांना विचारपूस केली असता त्यांनी मी रोजच सकाळच्या पाळीत विद्यार्थ्यांच्या शिस्त राखण्याच्या या शैक्षणिक कार्यात मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. असा प्रकार तालुक्यातील अनेक शाळेत सुरू असल्याचे दिसते. तर शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद घरातून वेळेवर निघतात मात्र सिग्नल, रेल्वे फाटक व इतर कारणांमुळे त्यांना शाळेत येण्यास उशीर होत असल्याचे गट ग्रामपंचायत सालवा अंतर्गत येणाऱ्या जि प प्राथमीक शाळा खोपडी येथील विद्यार्थी व पालकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.
अशैक्षणिक कामासह शैक्षणिक कामातही मदत करणाऱ्या खिचडी शिजवणाऱ्या महिला व पुरुषांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी तालुक्यातील खिचडी शिजवणाऱ्या महिला व पुरुषांनी केली आहे.

