spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्याबद्दल च्या निर्णयाचे भंडारा जिल्हा प्रहार संघटनेने केले स्वागत

– प्रहार संघटना भंडारा जिल्हा तर्फे जिल्हा सचिव चारूल रामटेके यांनी केले मत व्यक्त

बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसून पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या, शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग हितासाठी घेतलेला आहे.

आज आपण पाहतात शेतकरी अडचणीत आहे, मजूर आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहे, दिव्यांगांना त्यांच्या हक्कांसाठी अजूनही लढा द्यावा लागतो, महिलांना अनेक अश्या अडथळ्यांना आजही सामोरे जावे लागते. या सर्व प्रश्नांवर फक्त आंदोलन करून चालत नाही, तर सत्तेत राहून ठोस निर्णय घेणे आवश्यक असते. म्हणूनच हा निर्णय सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेतला गेला आहे.

आपण आजपर्यंत पाहिले आहे कि, बच्चू कडू यांनी आजपर्यंत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी रस्त्यावर उतरून जनतेसाठी लढा दिला आहे. त्याचबरोबर आजपर्यंत 140 पेक्षा जास्त वेळेस रक्तदान केले आहे तसेच आजपर्यंत 350 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तरी पक्ष बदलला म्हणुन काही लोक आज बच्चू कडू यांच्यावर टीका टिपण्णी करत आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो, बच्चू कडू यांनी आज जरी पक्ष बदलला असला तरी त्यांचे ध्येय अजिबात बदललेले नाही—जनतेचा न्याय आणि विकास हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे.

आता या नव्या व्यासपीठाच्या माध्यमातून पेन्शन, हमीभाव, दिव्यांग कल्याण, महिलांसाठी विशेष योजना यांसारख्या मुद्द्यांवर अधिक ताकदीने आणि प्रभावीपणे काम केले जाईल.

हा निर्णय कोणावर टीका करण्यासाठी नाही, तर अधिक चांगले काम करण्यासाठी आहे. आम्ही सकारात्मक राजकारणावर विश्वास ठेवतो आणि जनतेच्या हितासाठी प्रहार संघटना व शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच कटिबद्ध राहू.

शेवटी, आमचा एकच संकल्प आहे—जनतेचा न्याय, विकास आणि हक्कांसाठी अखंड लढा!

Popular Articles