spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सूर नदीला पेचचे पाणी सोडण्याकरिता तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे यांचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन

किशोर साहू, मौदा :- वाढत्या तापमानामुळे नदी पात्रातील संपूर्ण परिसर कोरडे पडल्यामुळे अनेक गावातील विहिरी तसेच नळ योजनेतील विहिरी कोरड्या पडल्या असून गावाला पाणी देण्यास अडचण निर्माण होत असून आणि जनावरांना पशू पक्षांना सुद्धा पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अश्या अनेक ग्रामपंचायत च्या तक्रारी संबंधी ठराव ज्यामध्ये इंदोरा, वाकेश्वर, अरोली,भांडेवाडी, चोखाळा तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे यांच्याकडे आलेले होते. त्या सर्व ठरावांचे निवेदन भुरे यांनी आज शनिवार (तारीख २ मे ) ला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना दिले आणि सूर नदीला पाणी सोडण्यासाठी विनंती केली.

समस्येचे गांभीर्य लक्षात घेता मंत्री जयस्वाल यांनी लगेच कलेक्टर यांना तसे पत्र लिहिले व भ्रमणध्वनीद्वारे सांगितले की, लवकरात लवकर आपण तसे नियोजन करून पेच चे पाणी सूर नदीला सोडावे.काहीं दिवसातच सूर नदीला पाणी सोडण्यात येईल असे कलेक्टर यांनी मंत्री जयस्वाल यांना सांगितल्याचे भुरे यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.