spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सती अनुसया माता श्रीचरण पादुकांचे कांद्री येथे दर्शना लाभ

कन्हान :- पारडशिंगाच्या सती अनुसया माता श्री चरण पादुका कांद्री येथिल गणेश भक्ते यांचे निवास स्थानी ढोल ताश्याच्या गर्जेणेत व फुलांच्या वर्षावात आणुन पुजा अर्चणा करून दर्शना करिता ठेवण्यात आल्याने कांद्री व कन्हान शहरवासी यानी श्रीचरण पादुका दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला.

गुरूवार (दि. ३०) एप्रिल २०२६ ला नगर पंचायत कांद्री अंतर्गत श्री दत्तात्रय मंदिर जवळील गणेश भक्ते यांचे निवास स्थानी सती अनसुया माता, पारडसिं गा यांचे श्रीचरण पादुकांचे आगमन झाले असता मेन रोड कांद्री पासुन मंदिरा पर्यंत ढोल, ताश्या च्या गजर्रा त आणि फुलांचा वर्षावात गणेश भक्ते यांचे निवास स्थानी आणुन सती अनुसया माता श्रीचरण पादुकांचे गणेश भक्ते परिवारासह नगरवासीयानी विधीवत अभिषेक, पूजा पाठ करून दर्शना करिता ठेवण्यात आल्या. श्रीचरण पारडसिंगा ते कांद्री येथे सोबत घेऊन आले ले मंडळी यात गुणवंत ढोले, येवले काका, अविकांत खंडाईत, मंदिर पुजारी यांचे राजेश भक्ते यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत, सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगर पंचायत कांद्री बांधकाम सभापती अतुल हजारे, नगरसेवक शिवाजी चकोले, राजहंस वंजारी, मारोती कुंभलकर, रामा हिवरकर, सुरज सरोदे , युवराज भक्ते, शालीक चौधरी, किशोर निमपुरे, शोभा वझे, माला भक्ते, मंगला कामडे, श्रृती वंजारी, उज्ज्वला भक्ते, हिरा वंजारी, आशा हटवार सह समस्त भाविक मंडळीनी प्रामुख्याने उपस्थित राहुन श्री चरण पादुकांचे दर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयो जन गणेश भक्ते व मित्र परिवार व्दारे करण्यात आले होते.

Popular Articles