spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघाये महाविद्यालय लाखनीचा बारावी परीक्षेत उल्लेखनीय यशाचा झेंडा

– विज्ञान शाखेत 92.56 टक्के निकाल; कला शाखेत अवंती टिचकुले तालुक्यात प्रथम

हंसराज,भंडारा लाखनी :- स्व. निर्धन पाटील वाघाये ज्युनिअर कॉलेज, लाखनी येथील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल 92.56 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विज्ञान शाखेत अमृता मोहन फेंडर हिने 77.83 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. दिव्यांशू बलवंत वंजारी याने 75 टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान मिळविले, तर दुर्गेश योगेश्वर क्षीरसागर याने 74.83 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

कला शाखेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशाची परंपरा पुढे नेली. अवंती टिचकुले हिने 86.50 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. रमादेवी हारोडे हिने 75 टक्के गुणांसह द्वितीय स्थान पटकावले, तर समीक्षा उकेटोने हिने 57.83 टक्के आणि प्राप्ती चोपकर हिने 54.83 टक्के गुण संपादन केले. कला शाखेचा एकूण निकाल 53.84 टक्के लागला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे लक्ष्मी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सरोज सेवक वाघाये पाटील यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश कापसे तसेच प्रा. मनीषा सपाटे, प्रा. मंगेश कुकडे, प्रा. स्मिता तितरमारे, प्रा. कवि सूर्यवंशी, प्रा. मुनेश्वर हलमारे, प्रा. ज्ञानेश्वरी रहांगडाले, प्रा. यशोमती कागदे, प्रा. उमरकर आणि प्रा. गाढवे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकवृंद तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना देत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त केली. महाविद्यालयाच्या या उज्ज्वल निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.