spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय, लोकशाही आणि संविधानाचा….

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत असताना भारतीय जनता पक्षाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. यासोबतच पश्चिम बंगालमध्येही भाजपाने विजय मिळवत तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचल्याचे चित्र दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्ते, निवडणूक आयोग, तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षाबलांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, “विजय आणि पराभव हा लोकशाहीतील स्वाभाविक भाग आहे. मात्र पाच राज्यांतील जनतेने भारत ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. आज केवळ लोकशाहीच नव्हे, तर भारताचे संविधानही विजयी झाले आहे.” पश्चिम बंगालमध्ये 93 टक्के मतदान झाल्याचा उल्लेख करत त्यांनी याला ऐतिहासिक ठरवले. तसेच आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्येही मतदानाचे नवे विक्रम झाल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडणुकांमध्ये महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, “आज गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार आहे.” तसेच 2013 मध्ये पंतप्रधानपदासाठी उमेदवारी मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी काशी आणि गंगा मातेच्या आशीर्वादाचा संदर्भही दिला. आसाममधील विजयाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, तेथील जनतेने सलग तिसऱ्यांदा भाजपा-एनडीएला पाठिंबा दिला असून, आम्ही विकासासाठी कटिबद्ध आहोत. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीतही विकासाच्या कामांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या निकालांमुळे देशातील राजकीय चित्र बदलत असल्याचे दिसत असून, भाजपच्या वाढत्या प्रभावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.