Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 80 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 80 प्रकरणांची नोंद

0
2

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. रविवार व सोमवार (ता.3 व4) शोध पथकाने 80 प्रकरणांची नोंद करून 40,200 रुपयाचा दंड वसूल केला.सार्वजनिक ‍ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी /उघडयावर मलमुत्र विसर्जन करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 31 प्रकरणांची नोंद करून 12,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून रू.700 रूपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणीकचरा टाकणे या अंतर्गत 8 प्रकरणाची नोंद करून 3,200 रूपयाची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १,००० रुपयाची वसुली करण्यात आली.

मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता, मंडप कमान, स्तागे, इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरिता बंद करणे या अंतर्गत ३ प्रकरणाची नोंद करून ६,००० रुपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून २,००० रुपयाची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.हॉटेल मध्ये देसिल्तिंग चेम्बर नसणे चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून ५,००० रुपयाची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २२ प्रकरणांची नोंद करून 4,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. देव आर्या-6 यांनी रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकल्यामुळे रू.१०,००० दंड वसूल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. एस एस इन्फ्रास्ट्रक्चर यांनी रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकल्यामुळे रू.१०,००० दंड वसूल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत रोहन सोनावणे यांनी चेम्बर मध्ये बोरेवेलचे साहित्य टाकल्यामुळे रू.५,००० दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. अमर किरण शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.विजया लॉज यांनी रस्त्यालगत रेस्टोरंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क नसल्यामुळे रू. ५,००० दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसुल केला.