– ९६ टक्के गुण घेवून तालुक्यात प्रथम येत शाळेचे नावलौकिक
सचिन चौरसिया,रामटेक :- रामजी महाजन देशमुख नगरपरिषद विद्यालयाचा विद्यार्थी वंश भोजराज सांगोळे याने तब्बल ९६ टक्के गुण घेऊन रामटेक तालुक्यात प्रथम येत शाळेचे नावलौकिक केले. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या विद्यार्थ्याचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, उपाध्यक्ष आलोक मानकर, शिक्षण सभापती सुरेखा माकडे, नगरसेवक सुमीत कोठारी, शालीनी महाजन, प्रभाकर खेडकर, उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसिलदार रमेश कोळपे, नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत, शाळेचे मुख्याध्यापक डाँ मिलीद चोपकर, शिक्षक घोडमारे, प्रकाश उके, दिपक बांगडकर, रूपाली गवई, दुशांत कारामोरे, संदीप दामेधर, मंगला पोटभरे यांच्यासह सर्व शिक्षकांनी वंश सांगोळे व शारदा गोंविदा मोहनकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.