spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी तालुक्यात तरुणाईच्या फोनवरून सट्टेबाजीचा गोरखधंदा जोमात

संदीप कांबळे,कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहर सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यासाठी कुप्रसिद्ध आहे.जुगार, मटका,गुटखा, तंबाकुजन्य पदार्थाच्या अवैध विक्रीसह येथे क्रिकेटचा सट्टा सुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो. कामठी शहरातील सटोडीयाकडे फक्त शहर व ग्रामीण भागातीलच नाही तर तेलंगणाच्या आदीलाबाद,हैद्राबाद शहरातील जुगाऱ्यासह इतर जिल्ह्यातील जुगारी क्रिकेट वर सट्टा लावीत असतात यावरून येथील क्रिकेटच्या सटट्याची व्याप्ती किती असेल हे कळून येते.कामठी शहरातील बहुतांश तरुणाई ऑनलाईन जुगार आणि सटट्याच्या विळख्यात सापडली आहे.आता तर आयपीएल च्या नावाखाली सटट्याच्या हा गोरखधंदा शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.खेळ खेळापूरता मर्यादित राहिलेला नसून आर्थिक उलाढाल आणि वाममार्गाकडे नेणारा ठरत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणारे काही चेहरे या सट्टा बाजाराचे सूत्रधार असल्याची चर्चा आहे.या बुकींचे मनोबल इतके उंचावले आहे की त्यांना कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाही .दररोज लाखो रुपयांची हार जित होत असताना पोलिसानी केलेली किरकोळ कारवाई ही केवळ ‘साहेबाना’ दाखविण्यासाठी केली जाते की काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या मे 2026 आयपीएल क्रिकेट स्पर्धा भारतात 28 मार्च 2026 ला सुरू झाली असून देशातील विविध 13 शहरातील स्टेडियम वर क्रिकेट स्पर्धा होत असून अंतिम सामना 31 मे 2026 रोजी अहमदाबाद येथिल नरेंद्र मोदी स्टेडीयम वर होणार आहे.. या स्पर्धेचे तरुणाईत क्रेझ वाढली आहे. आयपीएल सट्टेबाजीचा बाजार अत्यंत उत्तेजित असून बुकी चालकांचे धागेदोरे विदेशातही जोडल्या गेल्याने बहुतांश तरुणाईच्या फोनवर सट्टेबाजीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.यामध्ये कमकुवत संघाला डबल चा भाव देण्यात येत आहे.

क्रिकेट विश्वात महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आयपीएल झगमटाने तरुणाईसह प्रौढांचे डोळे सुद्धा टिपून गेले आहेत.याचाच फायदा उचलत काही अवैध धंदे चालकांनी पैसे कमविण्यासाठी वेगळी शकल् लढवून अनधिकृतपणे आयपीएल च्या प्रत्येक सांमन्यावर सट्टा घेण्याचा गोरखधंदा सुरू करून गोरगरिब शेतमजुरी करणाऱ्या तसेच धनाड्यांना अधिकचे पैसे कमविण्याचा आमिष दाखवून सर्रासपणे चुना लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.

..आयपीएल च्या प्रत्येक सामन्यावर कामठी तालुक्यातील एजंट कढून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.यात बहुतांश तरुणाई सह रोज मजुरी करणारे लोकही पैश्याच्या प्रलोभनापोटी या सट्याच्या आहारी जाऊन कर्जबाजारी होत आहेत.येथील बुकी फोनवर आयपीएलचा सामना चालू होण्यापूर्वी मोबाईलवर नानेफेके पासून कमकुवत संघ ,आवडता संघ,सामन्यातील प्रत्येक चेंडू ,शतक,धावा,खेळाडू, चौकार, षटकार जिंकणारा संघ,हरणारा संघ,अधिक गोष्टीवर अधिक गोष्टीवर कमी अधिक भाव देऊन मोठ्या प्रमाणात सट्टा घेतात.क्रिकेटप्रेमीच्या मोबाईलवर सदरील सट्टेबाजीचे भाव मोबाईल संदेशद्वारे पसरवले जातात त्यातुन दर दिवशी बुकी चालक लाखोंची उलाढाल करून मालामाल होत आहेत तर तरुणाई कर्जबाजारीच्या खाईत जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.