spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गट ग्रामपंचायत आदासा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत आदासा अंतर्गत येत असलेल्या आदासा व हिवरा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन मौदा तालुका भाजपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते शुक्रवार (ता. 9 मे) ला संपन्न झाले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना यावेळी प्रारंभ करण्यात आला.गट ग्रा.पं. आदासा अंतर्गत आदासा पोच मार्ग इजिमा 213 ला मिळणारा रस्ता बांधकाम कार्य (30लक्ष ).

गट ग्रा.पं. आदासा अंतर्गत बल्ल्याची पहाडी ते चिखलाबोडी येथे सिमेंट रस्ता बांधकाम कार्य(40 लक्ष)

याप्रसंगी माजी जि. प सदस्या राधा मुकेश अग्रवाल, सरपंच आदासा संजय आतिलकर, उपसरपंच आकाश मारबते, उपसरपंच खात रविंद्र मंडारकर, ग्रामपंचायत सदस्य अमित लांजेवार,जीवन बांते, जगदीश सदावर्ते, बाबूलाल सेलोकर, मनोहर सेलोकर, रामचंद्र मते, वामन लेंडे, शंकर वनवे,दुर्योधन बांते व इतर मान्यवर उपस्थित होते.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहून जनतेच्या अपेक्षेनुसार विकासकामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न कायम राहणार असल्याचे मत यावेळी मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.