spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवनी तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; २० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कंबर कसली असून, पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत ब्राम्हणी शिवार येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर आणि ५ ब्रास रेतीसह एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पवनी परिसरात पेट्रोलिंगवर असताना, पोलीस हवालदार मस्के यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ब्राम्हणी शिवार भागात विनापरवाना अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून धाड टाकली. यावेळी एक पिवळ्या रंगाचा अशोक लेलॅन्ड टिप्पर (क्रमांक एम.एच.३६/एफ.३३९५) संशयास्पदरीत्या रेती वाहतूक करताना आढळला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी टिप्पर चालक गणेश गुलाब वंजारी (वय ३६ वर्षे, रा. वलनी, ता. पवनी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातील २० लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि ३० हजार रुपये किमतीची ५ ब्रास रेती, असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शासकीय अधिकार क्षेत्रातील रेतीची विनापरवाना चोरी व वाहतूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३१६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा. मस्के व त्यांच्या ताफ्याने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.