spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ध्रुव बहुउद्देशीय विकास संस्था च्या वतीने मोफत जलपात्र वितरण

– ‘पक्षी वाचवा,सृष्टी वाचवा’या संकल्पनेतून मोफत जलपात्र वितरण

कामठी :- आजच्या धावपळीच्या युगात काही कारणामुळे पक्ष्याचे नैसर्गिक अधिवासाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.अश्या वेळी आपली एक छोटीशी मदत पक्ष्यासाठी जीवनदान ठरू शकते .

वास्तविकता निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी महत्वाचे आहेत,.

चिमणी,

साळुंकी,

कावळा,

पारवा हे पक्षी हळूहळू कमी होताना दिसत आहेत त्याना जगवणे ही आपली जवाबदारी आहे.तेव्हा आज घराबाहेर पडताना प्रथम एका जलपात्रात पाणी भरण्याचे काम करूया ‘पक्षी वाचवा ,सृष्टी वाचवा’ हा संदेश घरोघरी पोहोचवूया असा संकल्प सर्वांनी करावा असे मौलिक मत नगरसेवक योगेश गायधने यांनी ध्रुव बहुउद्देशीय विकास संस्था,कामठीच्या वतीने आयोजित मोफत जल पात्र (सकोरा) वितरण’ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. संस्था द्वारा आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कामठी नगर परिषदचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, भाजप कामठी शहर माजी अध्यक्ष विवेक मंगतानी, भाजप कामठी शहराध्यक्ष मंगेश यादव , कमल करवा, संस्था अध्यक्ष नरेश पारवानी प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान उपस्थित पाहुण्यांनी उन्हाळ्यात पक्ष्यासाठी पाणी ठेवणे हा खरंच छोटासा पण मोठा बदल घडवणारा विचार आहे.उन्हाच्या तीव्रतेत आपल्याला जसे घश्याला कोरड पडते तसेच पक्ष्यानाही वणवण फिरून कोरड पडते.तेव्हा या जलपात्रात पाणी ठेवून निसर्गातील मुक्या जीवाना जीवनदान देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान, अजय बोढारे,नगरसेवक लालसिंह यादव,डॉ संदीप कश्यप , कमल यादव ,राजेश खंडेलवाल, विनोद संगेवार,विमल झमतानी, प्रमेंद्र वाही, राजेश देशमुख, योगेश गायधने, राज हाड़ोती ,नगरसेवक दिलीप बांड़ेबुचे, जितेंद्र खोबरागड़े, उज्जव रायबोले,नरेश कलसे , नितिन रावेकर, उमेश मस्के,बरकत अली ,सुनील शिलाम,सुनील खानवानी ,अनिल पिंगले, अलकेश लांजेवार,सागर बिसने , प्रमोद वर्णम,प्रीतम यादव,विजय कनोजिया नगरसेविका अंतरा ताई वैद्य ,दिव्या गायधने,मनीषा नागपुरे, रौशनी कानफाड़े,प्राची मेंढ़े,चंदा तुरस्कर,आरती मंगलानी आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.