किशोर साहू, मौदा :- शुक्रवार ( ता. १५ मे) ला गट ग्रामपंचायत पिपरी (खंडाळा) अंतर्गत येत असलेल्या खंडाळा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकुल तंत्रज्ञान अंतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी गोळा करणे, निंबोळी अर्क तयार करणे, मोहीम राबविण्यात आले. यावेळी दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दिनेश फुंडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा यांनी निंबोळी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, जीवामृत, अग्निस्त्र, घनजीवामृत, एसआरटी ,डीएसआर , श्री पद्धत इत्यादी विषयी माहिती दिली. श्री. पंकज ठेंगणे, उपकृषी अधिकारी यांनी प्रकल्प अंतर्गत विविध योजना तसेच जैविक कीड नियंत्रण बद्दल माहिती दिली.तसेच जमीन सुपिकता निर्देशांक नुसार खतांची मात्रा,युरिया, डीएपी खतास पर्यायी खतांचा वापर, हिरवळीची खते, नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा वापर, अझोला निर्मिती बाबत माहिती देण्यात आली. यापूर्वी (ता 15 मे )ला च गट ग्रामपंचायत पिपरी (खंडाळा) अंतर्गत येत असलेल्या पिपरी व गुरुवार (ता. 14 मे) ला गट ग्रामपंचायत वाकेश्वर अंतर्गत येत असलेल्या श्रीखंडा येथे अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात आली.
यावेळी दिनेश फुंडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा,पंकज ठेंगणे उपकृषी अधिकारी निमखेडा 2, बसवराज सिंहासन, कृषि सेवक , हरदीप राऊत, समूह सहाय्यक, संगीता सोमनाथे कृषी ताई व शेतकरी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील व मंडळ कृषी अधिकारी यसलव बावनकर यांचे सहकार्य लाभले.