spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘उपजिल्हा रुग्णालय’ व ‘ट्रॉमा सेंटर’चा दर्जा द्या

– खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदनाने मागणी

कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ हा कन्हान-पिपरी शहरातुन जात असुन या शहराची दिवसेदिवस वाढती लोकसंख्या आणि राष्ट्रीय महामा र्गावरील अपघातांची वाढती मालिका लक्षात घेत येथी ल प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर १०० खाटांच्या ‘उपजिल्हा रुग्णालयात’ करावे व तातडीने ‘ट्रॉमा सेंटर’ मंजुर करावे, ही मागणी रामटेक लोकसभेचे खासदार मा. श्यामकुमार बर्वे यांना जागरूक सामाजिक कार्यकर्त्यासह नागरिकांनी निवेदन देऊन करण्यात आली आहे.

रविवार (दि.१७) मे २०२६ ला कन्हान शहरातील जागरूक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी शंकर नगर कांद्री-कन्हान येथिल रामटेक लेकसभेचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या कार्यालय गाठुन निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

यात वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सुविधेची प्रतिक्षा

ग्राम पंचायतीचे कन्हान-पिपरी नगरपरिषदेत रूपांतर होऊन शहरी भागात मोडत असुन पारशिवनी तालुक्यातील ही सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आणि परिसरातील ४० गावांची मोठी बाजारपेठ आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे जँक्शन, रसत्याचे चारही बाजुनी जाळे, बाराही महिने वाहणारी पिण्याचे पाणी पुरवठा करणारी कन्हान नदी असल्याने कोळसा खाणी आणि औद्योगिक क्षेत्रामुळे येथे नागरिकांची दररोज चांगलीच मोठी वर्दळ असते. मात्र सामान्य प्रसुती, आकस्मिक सेवा आणि रूग्णाना, बालकाना आरोग्याच्या समस्या यां सारख्या मूलभुत सुविधांसाठीही गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांची पायरी चढावी लागते, जे त्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवु न देऊन तज्ञ डॉक्टरांचे चंमु सह आधुनिक सोयीसुविधा युक्त १०० खाटाचे उपजिल्हा रूग्णालय बनविण्यात यावे.

महामार्गावरील मृत्यू रोखण्यासाठी ट्रॉमा सेंटरची गरज

कन्हान शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर वसलेले असुन कन्हान ते जबलपुर, कन्हान ते भंडारा, रामटेक, पारशिवनी, सावनेर, मौदा, काम़ठी, नागपुर अश्या चारही बाजुनी रस्त्याचे जाळे असल्याने या रस्त्यावर आणि मार्गावर वारंवार भीषण अपघात होत असतात. मात्र स्थानिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर आणि अत्याधुनिक संसाधनांचा अभाव असल्याने गंभीर जख्मींना २० ते ३० किमी दुर नागपुरला उपचारार्थ हलवावे लागते. अनेकदा वेळेवर उपचार न मिळा ल्याने जख्मींचा वाटेतच मृत्यु होतो. ही ‘गोल्डन ऑवर’ मधील जीवितहानी टाळण्यासाठी कन्हान येथे सुसज्ज ‘ट्रॉमा सेंटर’ असणे अत्यंत आवशक्यता अनिवार्य आहे . यास्तव १) कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘उपजिल्हा रुग्णालय’ चा दर्जा देऊन १०० बेडची क्षमता वाढ वावी. २) महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी तात्काळ ‘ट्रॉमा सेंटर’ कार्यान्वित करण्याकरिता राज्य व केंद्र शासना च्या संबंधित मंत्रालयांकडुन प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा. आदी प्रमुख समस्यांचे गांभिर्य लक्षात घेत खासदार श्यामकुमार बर्वे यांनी लवकरच सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन देताना कन्हान शहरातील नितिन मेश्राम प्रसिद्धी प्रमुख रिपब्लिकन सांस्कृतिक संघ महाराष्ट्र प्रदेश, प्रशांत बाजीराव मसार प्रख्यात समाजसेवी, गणेश भालेकर, सचिन यादव, अमोल वंजारी आदीसह जागरूक सामाजिक कार्यक र्ते व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.