spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कॉक्रिट मिक्सर ट्रक अंगावरून नेल्याने एका मजुरा चा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी

कन्हान :- पासुन ०७ किमी अंरावर राष्ट्रीय महामार्गा वरील डुमरी रेल्वे स्टेशन येथिल रेल्वे साईडींग येथे बॉऊंड्री वॉल चे काम करणा-या मजुरांच्या अंगावरून कॉक्रिट मिक्सर मशीन ट्रक नेऊन झालेल्या अपघातात मजुर रूपेश कुमार यांचा दुर्दैवी मुत्यु झाला तर दुसरा मजुर विमलेश कुमार गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोस्टे आरोपी ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

जे.एम.जे.एम. कन्ट्रक्शन कंपनीचे डुमरी रेल्वे साईड येथे बॉऊंडीवॉल चे काम सुरू असुन ६ ते ७ महिन्यांपासुन बिहार राज्यातील बेगुसराय जिल्हाचे मजुर काम करित आहे. शनिवार (दि.१६) च्या मध्यरात्री आणि रविवार (दि.१७) च्या पहाटे सकाळी ३.३० वाजता विमलेश कुमार दिनेश शॉह वय २४ वर्ष राह. बगनगाभा त. बिरपुर जि. बेगुसराय (बिहार) व रूपेश कुमार शंभु शॉह वय १९ वर्ष राह. वार्ड क्रं.०६ खमहार जि. बेगुसराय (बिहार) आणि कारेलाल शॉह तिघे ह. मु डुमरी खुर्द त. पारशिवनी हे काम करून थकल्याने तिघेही पहाटे सकाळी ४ वाजता काम सुरू असलेल्या बॉऊंड्री वॉल जवळ आराम करित झोपले. काही वेळा ने कॉक्रिट मिक्सर मशीन ट्रक क्र. एमएच ३१ एफयु ९२१६ चा चालक अंकित कूमार राजेन्द्रलाल याने निष्काळजीने वाहन चालवुन दोन मजुराच्या अंगाव रून नेले. यात विमलेश कुमार शॉह च्या दोन्ही पाय फँक्चर झाले तर रूपेश कुमार शॉह च्या पोटावरून चाके नेल्याने दोघानाही गंभीर दुखापत झाल्याने सुपर वायझर प्रशांत वासेकर आणि विनोद जूयनाके आणि मजुर यानी जख्मी दोघानाही रियान हॉस्पीटल रामटेक येथे उपचाराकरिता नेले असता तेथिल डॉक्टर ने रुपेश कुमार शॉह ला तपासुन मृत घोषित केले आणि विमले श कुमार ला पुढील उपचाराकरिता कामठी ला नेण्यास सांगितले.

पो.स्टे रामटेक यांनी सदर घटना कन्हान पोस्टे अंतर्गत असल्याने शुन्य एफआर नोंदवुन मृतक रूपेश कुमार शॉह यांची रामटेक उपजिल्हा रूग्णालयात उत्त रिय तपासणी करून सर्व कागदपत्रसह कन्हान पोस्टे ला सुपुर्द केले. कॉक्रीट मिक्सर मशीन ट्रक चार चक्का क्र. एमएच ३१ एफयु ९२१६ चा चालक अंकित कुमार राजेन्द्रलाल याने निष्काळजीपणे व हयगयीमुळे आप ले वाहन चालवुन अपधात केल्याने फिर्यादीचे पाय फैक्चर होवुन गंभीर दुखापत झाली व रुपेशकुमार चा मुत्युस कारणीभुत झाल्याने कन्हान पोलीसानी जख्मी फिर्यादी विमलेश कुमार शॉह यांचे तोडी बयाणावरून अप. क्र. ३५२/२०२६ कलम १०६ (१), २८१, १२५ (बी) बी.एन.एस. अन्वये आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवधरे यांचे मार्गदर्शनात पुढील तपास करित आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.