spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रात्यक्षिकेद्वारे जनजागृती

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात सध्या खरीप हंगामचे वारे वाहू लागले असून, कृषि विभागामार्फत हंगामपूर्व मोहिमाना वेग आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत “ हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रात्यक्षिक” मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात शाश्वत शेती कशी करावी, याचे मार्गदर्शन केले जात आहे. गडचिरोली जिल्हयातील तालुक्यामध्ये या मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश बदलत्या हवामानाशी जूळउन घेण्यासाठी तसेच EL nino च्या पूर्वतायरीसाठी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन कृषि विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत केले जात आहे

वाढत्या तापमानामुळे आणि अनिश्चित पावसामुळे शेती व्यवसायात अनेक आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान’ मोहीम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकेल.

या हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कृषि विभागातील सर्व अधिकारी व नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ मध्ये कार्यरत प्रकल्प गावातील कृषिताई,समूह सहाय्यक,तंत्रज्ञान समन्वयक,प्रकल्प विशेषज्ञ,सहाय्यक कृषि अधिकारी,तालुका कृषि अधिकारी,उपविभागीय कृषि अधिकारी,सर्व नोडल अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्य करीत आहे.

तसेच “हवामान अनुकूल तंत्रज्ञान – CRT अभियान प्रात्यक्षिक व जनजागृती मोहीम 20 एप्रिल ते 30 मे दरम्यान प्रकल्पा अंतर्गत गावामध्ये सुरू आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी यांनी मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, प्रिती हिरळकर यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.