spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 54 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. रविवार व सोमवार (ता.17 व 18) शोध पथकाने 54 प्रकरणांची नोंद करून 38,500 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9,200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून रू.500 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 9 प्रकरणाची नोंद करून 3,600 रूपयाची वसुली करण्यात आली.

मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 1,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. विभा अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. अरनेफ फुडव मे. केसानो बार अँड रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. युरो काईंडस् यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुली करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत संजय मदन यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. चाप कॉर्नर यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले.तसेच मे. सुरेखा इंडस्ट्रीज् यांनी चेंबरवर स्क्रॅपचे साहित्य टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. मोहन किराणा स्टोर व मे. सोनु स्वीट भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. रेनॉल्ट सर्व्हिस सेंटर यांनी फुटपाथ गाडयांनी गुंतवल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.

आशीनगर झोन अंतर्गत मे.रवि पॅकिंग यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हिचकी ग्रँड रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. प्रदीप एस.रंगारी यांनी बोरवेल खणतांना विनापरवानगी रस्त्यावर पाणी सोडल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 13 प्रकरणांची नोंद करून रू.70,000 दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.