spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे ‘ट्रायबल फेलो’ची भरती

Ø २५ मे रोजी मुलाखतीचे आयोजन; २० हजार रुपये मिळणार मानधन

 यवतमाळ :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत दोन ट्रायबल फेलो पदांच्या निवडीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड १० महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २५ मे रोजी सकाळी १०.३० वाजेपासून वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ट्रायबल फेलो पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणक व इंटरनेट हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षांदरम्यान असावे. याशिवाय किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव (इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप किंवा स्वयंसेवी संस्थेमधील अनुभव) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

आदिवासी क्षेत्रात आदिवासी समुदायासोबत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य राहील. उमेदवारांना मराठीसोबत इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ट्रायबल फेलोसाठी पात्र उमेदवारांनी आव्शयक कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.