– उन्हाळी हमीभाव धान खरेदी केंद्राचा शुभारंभ संपन्न
यासीन शेख, गोंदिया :- दि. मार्केटिंग फेडरेशन जिल्हा गोंदिया अंतर्गत सब एजंट संस्था म्हणून दि. शेतकी खरेदी विक्री समिती अर्जुनी-मोर. यांच्या वतीने उन्हाळी हमीभाव धान खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते रविवार, ता. १८ मे रोजी करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी, “शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या धानाला योग्य हमीभाव मिळणे आवश्यक असून शासनाच्या खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा केंद्रांचे कार्य अधिक सक्षमपणे सुरू राहणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले.
गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे दि. तालुका शेतकी खरेदी विक्री समिती अर्जुनी-मोर. ही संस्था सब एजंट म्हणून खरीप व उन्हाळी पिकांचे हमीभाव धान खरेदी केंद्र चालवित आहे. अर्जुनी-मोर., महागाव, चान्ना, बोंडगावदेवी, वडेगाव स्टे. आदी केंद्रांवरून धान खरेदी केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी करणारी संस्था म्हणून अर्जुनी-मोर. येथील खरेदी विक्री समितीचा विशेष नावलौकिक आहे. सध्या उन्हाळी धान खरेदी केंद्र अर्जुनी-मोर. येथे सुरू करण्यात आले आहे.
शुभारंभ प्रसंगी खरेदी विक्री समितीचे उपाध्यक्ष विजय कापगते, नगरसेवक दानेश साखरे, राधेश्याम भेंडारकर, सुरेश गंथळे, संचालक लैलेश शिवणकर, पंढरी लोगडे, केशव गहाणे, सुभाष कापगते, श्रीराम कापगते, कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.