कामठी :- कामठी तालुक्यातील दिघोरी येथे तालुका कृषी अधिकारी, कामठी अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत श्री. प्रदीप कडभाने (उप कृषी अधिकारी ) यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यात हवामान बदलास अनुकूल शेती तंत्रज्ञान, दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच शाश्वत शेती व उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत विविध घटकांसाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करून लाभ घ्यावा याबाबत कु. अश्विनी साखरे (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी आवाहन केले.सोबतच घरगुती चाचणी पद्धतीने सोयाबीन उगवण क्षमता तपासणी,बीज प्रक्रिया मोहीम व खरीप हंगाम पूर्व व खरिपातील प्रमुख पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारबाबत मोहीम घेण्यात आली. शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच बीज प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत( FIR) शेतकऱ्यांना सांगण्यात आली. खरीप हंगामातील प्रमुख पिकांबद्दल चर्चा व पीक लागवड नियोजन बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बेडवर पऱ्हे लागवड, हिरवळीच्या खताचा वापर व महत्व, बाबत समजावून सांगण्यात आले. यावेळी सुनिल डाफ (सरपंच ),अश्विनी देशपांडे (उपसरपंच), स्नेहा ठाकरे (सचिव ),नरेंद्र घाटबांधे (तलाठी), वैशाली डाफ (कृषी ताई ), राजेश कारवटकर,चंद्रपाल पाटील, हरिपाल ठाकरे, हर्षा बोंबाटे, राजेश काळे, राजू सोनवणे(स्वयंसेवक), प्रविण ठुणे (स्वयंसेवक), छगन डाफ, ई. पुरुष शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.
दिघोरी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.