संदीप कांबळे, कामठी :- कामठी तालुक्यातील सुरादेवी गावातील पाटील कुटुंब हे प्रयोगशील शेतकरी कुटुंब म्हणून ओळखले जाते.या कुटूंबातील उच्चशिक्षित अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले सचिन उदाराम पाटील ने अभियांत्रिकीत बी ई इलेक्ट्रॉनिक्स,एम टेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करूनही शेती करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या कुटुंबाकडे एकूण 20 ते 30 एकर शेती आहे त्यातच वडिलांचे वाढते वय ,इतकी मोठी शेती करणे वडिलांना कठीण होत होते व म्हातारपनी आई वडिलांचा सांभाळ करण्याकरिता व लहानपणापासूनच त्यांची शेतीविषय आवड असल्यामुळे सचिन पाटील यांनी मासिक वेतन 70 हजार रुपयांची नोकरी सोडून आपल्या सुरादेवी गावात वडीलोपार्जीत शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रयोगशील यशस्वी शेतकरी असलेले सचिन पाटील यांनी खरीप हंगामात कापूस,तूर,भात,मक्का व रब्बी हंगामात गहू,हरभरा, मोहरी व तिन्ही हंगामात भाजीपाला पीक घेत असतात . कापूस तूर या पारंपारिक पिकात आधुनिक पद्धतीने सरी वराँब्यावर लागवड करणे,खुडणे शेडा खुणे, सेंद्रिय खत जैविक औषधांचा वापर ,सूक्ष्म सिंचन व नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल याबाबत प्रयत्नशील असतात. सचिन पाटील यांनी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची सततची कमी उत्पादकता लक्षात घेता त्यांनी सोयाबीन पीक न घेता 5 एकरावर मका पिकाची लागवड केली.,मका पिकाला खत औषधी आणि मेहनतीची अधिक गरज असते परंतु त्या पिकाला अत्यंत कमी पाणी लागते शेतकरी स्वता शेतात अंगमेहनत करून आणि आधुनिक मशागतीवर भर दिल्याने त्यांना यावर्षी खरीप हंगामात हेक्टरी 53 क्विंटल मक्का उत्पादन मिळाले असून 2 हॅकटर मध्ये त्यांना 1 लक्ष 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सचिन पाटील यांनी वडीलाकडून शेतीचा वारसा घेतला व शेतीची लहानपणा पासून आवड त्यामुळे त्यांनी वर्षभर उत्पन्न मिळत राहतील त्यादृष्टींने पीक पद्धतिची घडी बसवण्यास सुरुवात केली, त्यांनी खरीप हंगामात वांगी,टमाटर ,मिरची , कारले,लवकी तर रब्बी हंगामात फुलकोबी, टमाटर , चवळी,पालक ,कोथिंबीर उन्हाळी हंगामात भेंडी, गिलके,वांगी यासारखे पिके घेतात. भाजीपाला पिकाला पाण्याची गरज लक्षात घेता व पाण्याची बचत करण्याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर करतात, टमाटर, कारली, चवळी गिलके तारांवर लागवड करतात . भाजीपाला पिकामध्ये मर्यादित स्वरूपात कीडनाशकांचा वापर करतात तसेच दशपनी अंकाचा वापर करतात .भाजीपाला पिकातून वार्षिक उत्पन्न 2 लक्ष रुपये चा उत्पन्न मिळतो.पाटील यांच्याकडे 0.40हॅकटर क्षेत्रावर कागदी लिंबाची फळबाग असून ते फळबागेत रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खते देऊन वर्षाला 1 लक्ष 20 हजार रुपयांचे उत्पन्न घेत असतात.सचिन पाटील हे पारंपारिक पिकात आधुनिक पद्धतिने सरी वराव्यावर लागवड ,पिकाचे शेंडा खुडणे, जैविक खत औषधांचा वापर ,सेंद्रियखताचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल याबाबत प्रयत्नशील असतात .शेतीविषयक माहीती करिता शेतकरी मासिक ,युट्युबवरील शेतीविषयक चॅनल ,कृषी विभागातील अधिकारी यांच्यामार्फत मसर्गदर्शन घेत असतात.सचिन पाटिल यांना खरीप हंगामात मका पिकाचे 5 एकरात 106 क्विंटल ,कापूस पिकाचे 4 एकरात 30 क्विंटल,तूर पिकाचे 5 एकरात 40 क्विंटल ,भात पिकाचे 2 एकरात 35 क्विंटल व रब्बी हंगामात गहू पिकाचे 4 एकरात 50 क्विंटल ,मोहरी पिकाचे 1 एकरी 1.20क्विंटल उत्पादन मिळाले. सचिन पाटील हे आता केवळ पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता कुकुटपालनाच्या व्यवसायाकडे वळले आहे तसेच त्यांना कृषी विभाग अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून थ्रेसरचा लाभ मिळाला आहे.त्याचा वापर ते गावातील व जवळपासच्या गावातील इतर शेतकऱ्यांना सेवा देतात त्यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळतो. चक्राकार पीक पद्धतीमुळे व आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा योग्य वापर करून शेती व शेतीपूरक व्यवसायातून त्यांनी आपली अर्थकारण मजबूत केली आहे.
कामठी तालुक्यातील प्रयोगशील यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.