कामठी :- वाढते प्रदूषण व जमिनीची खालावलेली पोत सुधारण्यासाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने खेडी येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कामठी तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे याचे मार्गदर्शनात ‘खेडी’ ‘पांढरकवडा’ येथे शेतकरी मार्गदर्शन प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहा भगत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक व हवामानपूरक शेतीचे सविस्तर मार्गदर्शन केले.विविध तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शनया कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत ‘क्लायमेट रिझिलिएंट टेक्नॉलॉजी’ (हवामान अनुकूल तंत्रज्ञान) बाबत माहिती देण्यात आली. तसेच सगुणा राइस टेक्नॉलॉजी (SRT) या पद्धतीचा वापर करून कमी खर्चात व श्रमात भात शेती कशी करता येईल, याचे महत्त्व पटवून दिले.कीड नियंत्रणासाठी घरगुती अर्कावर भरशेतकऱ्यांनी रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर कमी करावा, यासाठी ‘दशपर्णी अर्क’ आणि ‘निंबोळी अर्क’ तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि विषमुक्त अन्नधान्य उत्पादन घेता येते, असे आवाहन यावेळी कृषी विभागामार्फत करण्यात आले. त्यावेळी तंत्रज्ञान समन्वयक एस. वानखेडे , समूह सहाय्यक स्वाती डेरे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी दोन्ही गावांतील अजय खोडके, अंकित रेवतकर, भारत डोहाळे, अनुप खंडाळे, ऋषिकेश खंडाळे, भारत ठाकरे सह प्रगतशील शेतकरी प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नैसर्गिक शेती ही काळाची गरज – तालुका कृषीअधिकारी प्रणित गंगावणे
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.