किशोर साहू, मौदा :- चाचेर – निमखेडा जि प क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तुमान, तरोडी आणि बारशी या गावांतील काँग्रेसचे प्रमुख नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सामूहिकपणे भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा रविवार (ता. 17 मे) ला पार पडला. मंत्री बावनकुळे यांनी स्वतः सर्व कार्यकर्त्यांना भाजपाचा दुपट्टा देऊन पक्षात औपचारिक स्वागत केले.
चाचेर भाजपा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौव्हान, पंचायत समिती माजी उपसभापती खेमराज चाफले, सरपंच संकेत झाडे, डॉ. दिनेश बादुले, व उमेश शेंडे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे.
तरोडी सेवा सहकारी संस्था अध्यक्ष जीवन टाले, उपाध्यक्ष माधव कोंगे, सदस्य योगेश पायतोडे, गट ग्रा पं तूमान ग्रा पं सदस्य भास्कर टाले, अध्यक्ष शाळा सुधार प्रविण पायतोडे, सदस्य अनिल पायतोडे, पुरुषोत्तम रंधई, तरोडी येथील माणिक पायतोडे, कृष्णा चौधरी, माजी ग्रा प सदस्या रेखा गजभिये, शुभांगी टाले ,प्रणाली टाले, रेखा रंधई , टिकाराम घोडमारे ,गजानन घोडमारे, संदीप हारोडे ,बारशी येथील राजकुमार झलके, सुरेश हिवसे ,अविनाश झलके, नितेश हिवसे ,रवी वासनिक ,उत्तम कडू ,वंश झलके ,अरुण घरजाळे ,मुकेश हिवसे सह इतर 100 च्या वर कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्याचे चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार डी . मल्लिकार्जुन रेड्डी, टेकचंद सावरकर, नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गज्जू यादव, रिंकेश चौरे, नरेश मोटधरे सह जिल्हा व तालुक्यातील भाजपा, भाजयूमो पदाधिकारी, नेते मंडळी उपस्थित होते.