कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनीत फिर्यादी नरेंद्र रोमेलसिंग बलोरिया यांच्या राहत्या भाड्याच्या घरच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने दिवसा ढवळ्या 1 लक्ष 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना काल सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली .यासं दर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.
..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कल्पतरू कॉलोनी येथे सतिशचंद्र ठाकूर यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास असून ते 6 मे पासून आपल्या मुळ गावी गेले होते.घरी कुनी नसल्याची संधी साधून चोरट्याने घराची खिडकी तोडून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील आलमारीच्या लॉकर तोडून आलमारीत ठेवलेले 1 लक्ष 66 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.