spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्मार्ट प्रकल्पांतर्गत उत्पादक भागीदारी उपप्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत उत्पादक भागीदारी उपप्रकल्पासाठी अनुदान वितरणाबाबत सर्व बाजूंनी सखोल तपासणी करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री दतात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित स्मार्ट प्रकल्पाच्या आढावा बैठकीत उत्पादक भागीदारी उपप्रकल्पांतर्गत प्रथम अनुदान हप्ता वितरणास मुदतवाढ देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक प्रदीप चंद्रन, कृषी संचालक सुनिल बोरकर, उपसचिव गणेश कचरे तसेच फार्मेक्सो ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, रेंदाळचे धन्यकुमार कोळी आणि महावीर पाटील उपस्थित होते.

कृषि मंत्री दतात्रय भरणे म्हणाले की, अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता शेतकरी व उत्पादक संस्थांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.