spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी शेवटची संधी !

– ३० जूनपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ :-  जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्याच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदतवाढ दिली असून वाहनधारकांना आता ३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची संधी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एचएसआरपी नंबर प्लेटसाठी रोसमेर्टा सेफ्टी सिस्टिम लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींगसाठी mhhsrp.com हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

वाहनधारकांना या पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेता येणार आहे. यापुर्वी यासाठी दि.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, त्यास आता अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून ३० जून २०२६ पूर्वी वाहन मालकांनी त्यांच्या वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसवुन घ्यावी, दि.१ जुलै २०२६ नंतर एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी विहित शुल्काचा भरणा करुन वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सुर्यवंशी यांनी केले आहे.

Popular Articles