spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अरोली टोली येथे नवीन ट्रान्सफॉर्मर व पेटीच शुभारंभ

किशोर साहू, मौदा :- अनेक दिवसापासून अरोली टोली येथे व्होल्टेज ची समस्या निर्माण होत असल्याने तेथील नागरिकांनी याबाबत तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर भुरे यांनी याबाबत अरोली वितरण कंपनीचे अभियंता यांच्याकडे अरोली टोली वरची कमी होल्टेज ची समस्या सोडवण्यासाठी उपायोजना करण्याबाबत चर्चा केली.

त्यानंतर अरोली अभियंता यांनी तसा नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आणि पालकमंत्री बावनकुळे व राज्यमंत्री जयस्वाल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिले, नुकतेच त्या ट्रांसफार्मर चे विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आले. ऐन तीव्र उन्हाळ्यात कमी व्होल्टेज ची अरोली टोली वरची अडचण दूर झाल्याने टोलीवरच्या नागरिकांनी तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे, मंत्री बावनकुळे ,मंत्री जयस्वाल, अरोली वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.