spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चक्काजाम आंदोलनाला यश ; प्रशासन नरमले

◼️पुलाच्या बांधकामाला लागणार १ वर्षाच्या कालावधी

◼️२.९८ कोटीच्या पुल कामाला मिळाली प्रशासकिय मान्यता

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील रामटेक -काचुरवाही मार्गावर चिचाला गावाजवळ पेंच नहरावर असलेला पूल वाकल्याने मागील ८ महिन्यांपासून दुचाकी वगळता येथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. १३ सप्टेंबर रोजी पुलात भेगा पडून गंभीर तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ वाहतूक बंद केली होती. मात्र यानंतर पाटबंधारे विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. ८ महिन्यांचा भलामोठा कालावधी उलटूनही दुरुस्ती किंवा नव्या पुलाचे बांधकाम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. तेव्हा ही समस्या हेरून पेंच पाटबंधारे विभागाच्या हेकेखोर भूमिकेच्या विरोधात भाजपा उपाध्यक्ष उदयसिंग ( गज्जू ) यादव यांनी प्रशासनाला चक्का जाम करण्याच्या इशारा दिलेला होता. परिणामस्वरूप प्रशाषण हादरले. त्यांची दखल घेत पेंच पाटबंधारे विभागाने २.९६ दोन कोटी छान्नव लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन त्यांची प्रशासकिय मान्यता प्रदान केली.

या दस्तावेजाची लेखी प्रत आंदोलनाच्या दिवशी म्हणजेच १९ मे ला पेंच पाटबंधारे उपविभागीय कार्यालय येथिल आंदोलन स्थळी तहसिलदार रमेश कोळपे यांच्या समक्ष प्रभारी सहाय्यक अभियंता बोरोले यांनी दिली. करीता गज्जु यादव यांनी उन्हातान्हात आलेल्या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करून आंदोलन संपृष्टात आल्याचे जाहीर केले. याप्रसंगी उदयसिंग उर्फ गज्जु यादव, जि.प. माजी सदर्‍य दुधराम सव्वालाखे, सरपंच कविता बसीने, सरपंच रणवीर यादव, नंदकिशोर कोहळे, श्रीराम गोंगले, वंसतराव जरवरकर, सागर लोंढे, पंकज घरजाळे, रामेश्र्वर गोंगले यांच्यासह शेकडो त्रस्त शेतकरी,विघार्थी पालक उपस्थित होते. आंदोलनस्थळी कुठलीहि अनुचित घटना घडू नये, त्याकरिता पोलीस निरिक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

पुलाच्या बांधकामाला लागणार १ वर्षाच्या कालावधी

सदर पूल सन १९८० मध्ये पेंच नहर बांधकामादरम्यान उभारण्यात आला होता आणि तो या भागातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग होता. पूल बंद झाल्याने रामटेक, काचुरवाही, लोहडोगरी, हातोडी, खोडगाव, किरणापूर, दुधाळा, बारसी, तारसा व मौदा या गावांतील संपर्क मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही गेल्या आठ महिन्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच कदाचित पुढील एक वर्ष सुद्धा असाच त्रास सहन करण्याची वेळ शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व शेतकऱ्यांवर येऊ शकते. नागरिकांना आता नवरगाव व संग्रामपूरमार्गे लांब व अरुंद पर्यायी रस्ता वापरावा लागत असून, या मार्गाचीही दुरवस्था असल्याने वेळ व इंधनाचा ८ कि.मी. चा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या पुलाला प्रशासकिय मान्यता दिली.पण पुढील १ वर्ष या पुलाच्या कामाला लागणार आहे. त्याला सर्वस्वी जवाबदार असलेल्या कार्यकारी अभियंता यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकर्त्यांनी केली आहे.

Popular Articles