नागपूर :- चालक- मालक संघ नागपूर च्यावतीने मेडिकलचे प्राव्हेट रुग्णवाहिका चालक -मायकल अँथोनी मॉरीस उर्फ मायकल अण्णा हे कुकडे ले आऊट येथील रहिवासी असून त्यांचे परसगांव बालाघाट येथून 19 तारखेला नागपूरला परत येते वेळेस अपघाती निधन झाले. ही घटना रुग्णवाहिका चालक- मालक संघाला कळताच मदतीची धाव घेतली. त्यांच्या कुटुंबांना नागपूर रुग्णवाहिका चालक- मालक संघा तर्फे ३० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबांना सुपुर्त करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मायकल अण्णांच्या कुटुंबातील मुलांच्या पुढील भविष्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले.
रुग्णवाहिका चालक- मालक नागपूर संघ ही संघटना मागील पाच वर्षापासून कार्यरत आहे परंतु कुठेही अपघात झाले तर ताबडतोब मदतीला धावून जातात. हे विशेष : त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश केळकर यांनी मदत केली आणि सोबतच गौरव पाटील, संघपाल वानखेडे, गजानन देशमुख, डॉ. अभिषेक राणा, रिंकेश कांबळे, नितीन वळतकर या सर्वांची यावेळी उपस्थिती होती.