– आरोग्य शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात २३ ते ३० मे दरम्यान नागपूरकरांच्या निरामय आरोग्यासाठी आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी माणकापूर येथील साईबाबा कॉलोनी येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपा महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे शुभ हस्ते करण्यात आले तर पूर्व नागपुरातील जागृत हनुमान मंदिर न्यू नंदनवन येथे रक्तदान व नेत्र शिबिराचे उद्घाटन आमदार कृष्णा खोपडे यांचे द्वारे करण्यात आले. या शिबिरात नागरिकांसाठी निशुल्क नेत्र, दंत तपासणी, महिलांसाठी कैंसर स्क्रीनिंग, अत्यल्प दरात रक्त तपासणी ,तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात हृदयरोग, न्यूरोलॉजी, अस्थिरोग, मधुमेह, स्त्रीरोग, पोटाचे – श्वसनाचे विकार, आदींचे मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरातील लाभार्थ्यांना मोफत चष्मा वितरित करण्यात आला तसेच गरजूं रुग्णांच्या निशुल्क मोतियाबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले. या प्रसंगी महामंत्री संदीप जाधव, नगरसेविका ममता ठाकूर, नगरसेवक निलेश गायधने, गणेश चरलेवार, रजनी वानखेडे, मनोज सिंग, आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे संयोजन भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर चे शिबिर संयोजक डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून रविवारी २४ मे ला हॅरिसन लॉन ,वाठोडा, सोमवारी २५ मेला सुगंध डेंटल क्लिनिक, अयोध्या नगर, मंगळवार २६ मे रोजी सार्वजनिक हनुमान मंदिर दिघोरी नाका, बुधवारी २७ मे रोजी प्रबोधन कॉन्वेंट महाल, २८ मे रोजी निकालस मंदिर इतवारी आणि ३० मे रोजी वैशाली नगर येथे भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून आपण नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर दुबे, मुन्ना ठाकूर, विलास सपकाळ,विनोद सोनी, अभिजित कथले, सुजाता कथोटे, आदी पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.