खापा, वार्ताहर :- आगामी सण उत्सवाच्या निमित्याने खापा पोलीस स्टेशन येथे शनिवार दि. २३ मे रोजी ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात बकरी ईद व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शांतता समिती व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
शहर व ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचे धार्मिक विरोधी किंवा गैरकृत्य होऊ नये, सोशल माध्यमांवर आक्षेपार्ह प्रसारीत करु नये, सामाजिक व जातीय सलोखा कायम राखावा. या उद्देशाने हि बैठक घेण्यात आल्याचे ठाणेदार भुजाडे यांनी सांगितले. याप्रसंगी गावागावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिक, शांतता समिती, दक्षता समिती व पोलिस पाटलांनी जातीने लक्ष ठेवत पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान ठाणेदार किशोर भुजाडे यांनी केले. तसेच कोणत्याही समाजकंटकाकडून त्रसदी होत असेल तर त्वरित खापा पोलीस स्टेशनला कळवावे. अशी सूचना ठाणेदार यांनी नागरिकांना केली.
यावेळी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर (बब्लू) शेख, सचिव मकसूद शेख, उपाध्यक्ष सईद कुरेशी, प्यारू शेख, शाकीर शेख, मस्तान कुरेशी, शब्बीर कुरेशी, असलम कुरेशी, नूर कुरेशी, युनुस कुरेशी, रफिक शेख, बडेगाव, वाकोडी , हिंगणा येथील नागरिकांसह परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.