spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाकोडी येथे गोवंश कत्तल प्रकरणी तिघांना अटक

– वाकोडी येथील ढिवरघाट लेंडी नदी पात्रातील घटना

खापा, वार्ताहर :- खापा पोलीस स्टेशन हद्दीतील वाकोडी येथील कन्हान नदीलगतच्या ढिवरघाट लेंडी परिसरात एका वासराची अवैध कत्तल केल्याप्रकरणी खापा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काही नागरिकांना टॉर्चचा उजेड आणि जनावराचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका वासराची कत्तल सुरू असल्याचे निदर्शनास आले. अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना गोरक्षकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सलाम सिकंदर बराडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता शुभम कृष्णा लोणकर आणि सुनील राहुल टेंभुर्णे यांची नावे समोर आली. तिन्ही आरोपी वाकोडी येथील रहिवासी असून खापा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जगदीश पालीवाल पुढील तपास करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.